बहुले येथील शेतकर्‍यांच्या धाडशी निर्णयामुळे शिवारात वळण बंधारे


(प्रतिनिधी) : बहुले येथील शेतकरी राजू पाटील यांच्या धाडशी निर्णयामुळे शिवारातील ओढे व वाया जाणारे पाणी अडवुन मातीचे वळण बंधारे बांधून पाणीसाठा केला. यामुळे बहुले गावच्या शिवारा शेजारील गावात उन्हाळी हंगामासाठी जलयुक्त शिवाराचे समाधान दिसत आहे. 

बहुले, ता. पाटण येथील दिव्यांग शेतकरी 9 एकर बागायत शेतजमीनीस बारमाही पाणीपुरवठा करण्याचा सतत प्रयत्न करत असताना यापुर्वीच्या प्रत्येक उन्हाळी हंगामात टंचाईस सामोरे जावे लागत असे. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी आपल्या शेतकरी सहकारी व लोकसहभागातील कार्यकर्ते सयाजी पवार, सर्जेराव पानस्कर, रामचंद्र पानस्कर, भरत पानस्कर, अंकुश पानस्कर, राजन पवार, शंकर पवार, दाजी पवार, पांडुरंग डवरी, मानसिंग पानस्कर, भिमराव जरे, भरत पवार यांच्या सोबत शिवारातून वाया जाणारे पाणी ठिकठिकाणी बंधारे बांधून आडवून पाणी साठा केला. ग्रामस्थांसमवेत लोकसहभागातून मातीचे बंधारे बांधून पाणी आडवा, पाणी जिरवा या मोहीमेची यशस्वी अंमलबजावणी केली.

येथील शेती 40 च्या दशकापासून विहरींच्या पाण्यावर अवलंबून असल्याने येथे विहरींची संख्या जास्त आहे. अलीकडील काळात विहरींची पाणी पातळी खाली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण होवू लागली होती. परिणामी शेतकर्‍यांच्या उत्पन्नात घट होत होती. दोन वर्षापुर्वी यांनी जिल्हा प्रशासनाकडे जलयुक्त शिवार योजनेची मागणी केली होती. त्यामधून ओढ्यावर चार सिमेंटचे बंधारे बांधले. पाणी आडविले याचा परीणाम पाणीसाठा होऊन विहीरीतही ऐन उन्हाळ्यात पाणीसाठा झाला. या चमत्काराच्या साक्षात्काराने प्रभावित होऊन व जबरदस्त इच्छाशक्ती घेऊन राजू पाटील यांनी व त्यांचे ग्रामस्थ सहकारी यांनी गेल्यावर्षी गट-तट विसरुन गावच्या पळशीच्या ओढ्यावर मातीचे बंधारे बांधले व पाणी आडविले. याचा परीणाम गावच्या विहीरी वर्षभर तुडुंब पाण्याने भरून राहील्या. याही वर्षी मातीचे बंधारे बाधण्यास सुरूवात केली. आतापर्यंत मिटर पाणीसाठ्याचा फुगवटा झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे शेतकर्‍यांना फक्त हजार रुपयात पाणी मिळू लागले.

प्रगतशील शेतकरी राजू पाटील यांच्या संकल्पनेतून गावातील शेतकर्‍यांनी लोकसहभागातून गेल्या वर्षीठिकठिकाणी 18 मातीचे बंधारे बांधून ओढ्याचे पाणी अडविले. त्यामुळे बंधार्‍यात पाणी साचून उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली होती. पाणी आडवा, पाणी जिरवा या मोहीमेचे महत्व ग्रामस्थांनी पटले असल्याने त्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामळे सुमारे 500 एकर शेती ओलीताखाली आली. उर्वरीते एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी धडपड चालू आहे. बहुले गावातील शिवारातील तसेच शेजारच्या गारवडे, पाळेकरवाडी येथील विहीरींना पावसाळ्या प्रमाणे पाणीसाठा झाला आहे. आज रोजी बहुले परीसरांतील बंधार्‍यात पाणी आडविल्याने सर्व पाण्याच्या विहिरी तुडुंब भरल्या आहेत. हे पाहण्यासाठी बाहेरून शेतकरी व शासकीय खात्याचे अधिकारी भेटीस येत आहेत. राजू पाटील यांनी इतर गावांसाठी आदर्श समोर ठेवला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget