Breaking News

नगर रोडच्या दक्षिण बाजूची पाईपलाईन लिकेज


बीड, (प्रतिनिधी):- शहरातील वार्ड क्र.१२ नगररोडच्या दक्षिण बाजूची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर  पाण्याची नासाडी होत आहे. याकडे लक्ष घालून तात्काळ पाईपलाईन लिकेज दुरुस्त करावी अशी मागणी तेथीलच शेख खमर शेख अब्दुल्ला यांनी काल मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.

बीड शहरातील बालेपीर दर्गाह ते पवनसुत मंगल कार्यालयापर्यंत एकुण आठ ठिकाणी पाईप लाईन लिकेज झालेली आहे. त्यातून येणार्‍या पाण्यापैकी ४० टक्के पाणी या भागातील नागरिकांना मिळत असुन उर्वरीत पाणी लिकेजमधुन नाल्यांमध्ये जात आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होवू लागली आहे. या भागात सर्वत्र दुर्लंधी पसरत आहे. याची दखल घेऊन तात्काळ लिकेज दुरुस्त करावी अशी मागणी बालेपीर येथील शेख खमर, शेख खलीलोद्दीन, शेख खय्युम, शेख पाशा यांनी केली आहे.