Breaking News

लघुउद्योजकांच्या आशेवर पाणी....


ठाणे : प्रतिनिधी

देशातील लघु उद्द्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून अशा प्रकारच्या धोरणांची लघु उद्द्योजकांना यापूर्वीच आवश्यकता होती . त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या लघु उद्द्योजकांसाठी दिवाळी पहाट असून यामुळे त्यांना सोनेरी दिवस येतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यात केले . 100 दिवसात या सर्व घोषणांची अंमलबजावणी होणार असून हा नवीन रेकॉर्ड होणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संवाद साधायला मिळेल या आशेवर ठाणे जिल्ह्यातील लघु उद्द्योजक आवर्जून उपस्थित होते . मात्र 4 तास प्रतीक्षा करूनही व्हिडीओ कॉन्फरसिंग झाली नाही . त्यामुळे लघु औद्द्योजकांमध्ये आणि छाया चित्र टिपण्यासाठी ताटकळत उभे राहिलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नाराजगीचे सूर होते.

देशभरातील 68 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधले होते . महाराष्ट्रातील 8 जिह्यांपैकी ठाणे जिल्ह्याची देखील निवड यामध्ये करण्यात आली होती . ठाण्यात ड़ॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . दिल्ली पेक्षा ठाण्यात खासकरून या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहिलेल्या केंद्रीय उद्द्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचे तोंडभरून कौतुक केले . आपल्या भाषणांत प्रभू यांनी लघु उद्द्योजकांच्या अडचणी मांडल्या . लघु उद्द्योजकांना रोजच अडथळ्यांची शर्यत करावी लागते . तरी हे औद्द्योग टिकून आहेत . जर अडथळे नसते तर उद्द्योग खूप पुढे गेले असते असे सांगून अशा धोरणांची यापूर्वीच आवश्यक होती असे प्रभू यांनी सांगितले . उद्द्योग चालवण्यासाठी लागणारे कर्ज , बाजारपेठ , व्याजदर , फॅक्ट्री निरीक्षकांची भीती अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत होते . त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन आणि यांची जाणीव ठेवून या घोषणा केल्या असल्याचे प्रभू यांनी सांगितले . अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी हि 100 दिवसांत होणार असून हा नवीन रेकॉर्ड होणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले . मराठी माणूस उद्द्योगात येत नाही . या विषयावर केवळ चर्चा केल्या जातात. या सर्व घोषणा देशातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या असून खास करून मराठी उद्द्योजकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले . दिल्लीत उपस्थित राहण्यापेक्षा ठाण्यात उपस्थित राहण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण ठाणे गाठले म्हणजे इच्छित स्थळी पोचलो असे म्हटले जाते . या योजना सर्व ठाण्याच्या उयोजकांपर्यंत पोचतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .
4 तास प्रसारमाध्यम आणि उद्योजक बसले ताटकळत

देशभरात आणि विविध जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे लघु उद्योजकांशी संवाद साधणार होते. तब्बल चार तास लघु उद्योजक आणि व्हिडीओ कॉन्फरसिंगचे छायाचित्रण करण्यासाठी आलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे ताटकळत उभे राहिले. अखेर व्हिडीओ कॉन्फरसिंग झालीच नाही. त्यामुळे लघु उद्योजक आणि प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारामध्ये नाराजगीचे सूर होते.