बाजार समितीच्या आवारात उभारणार व्यापारी संकुल


बुलडाणा,(प्रतिनिधी) : बुलडाणा मुख्यालयी असलेल्या कृषी उत्नन्न बाजार समितीला धाड नाका ते सर्क्युलर रोड वरील रस्त्यालगत बीओटी वरील 51 गाळे बांधकाम करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत 31 ऑक्टोबर रोजी प्रक्रीया पार पडली. बाजार समितीला प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातून लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. शिवाय बारमाही भाडे सुध्दा गाळे धारकांकडुन कायमस्वरुपी मिळणार आहे. त्यामुळे निश्‍चीतच बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडणार असुन या पुढेही आणखी प्रोजेक्ट हाती घेणार असल्याचे समापती जालिंदर बुधवत यांनी सांगितले.

 पणन महासंचालकांच्या आदेशाने बाजार समितीच्या सभागृहात बुधवार 31 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी गजानन आमले, वास्तुशास्त्रज्ञ रतन भोंगे, सभापती जालिंदर बुधवत उपसभापती पंजाबराव पाटील, सचिव कु. वनिता साबळे, संचालक सर्वस्वी गौतम बेगाणी, गजानन उबरहंडे, प्रभाकर काळवावे, सुनिल गवते, संजय गाढे, सुरेश देठे, भगवान शेळके, सिंधुताई मुठठे, अनिता पवार,श्रीकांत पवार, उत्तम कन्नर, राहुल सावळे, शेषराव अंभोरे, मनिषा उमेश अग्रवाल, बबन खरे, माणिकराव सावळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हर्रासी प्रक्रिया सुरु करण्यापुर्वी सभापती जालिंदर बुधवत यांनी या गाळे बांधकामा मागील मुभिका विषद केली. या प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद हा आमच्यावर विश्‍वास वाढवणारा आहे. या विश्‍वासाला सभापती या नात्याने बाजार समिती तडा जाउ देणार नाही, अशी ग्वाही दिली. आगामी काळात शेतकर्‍यांच्या हितासाठी याच परिसरात शेतीमाल, पुरक उद्योगाची दुकाने, खत विक्री, कापड, किराणा व अन्य व्यावसायीक सुविधा मिळाव्यात यासाठी आणखी प्रोजेक्ट हाती घेणार असल्याचेही बुधवत यांनी सांगीतले. सध्याच्या बीओटी तत्वावरील गाळे बांधकाम होवू नये, हर्रासी थांबवावी म्हणून काही विष्नसंतोषी प्रयत्न करत होते. मात्र हा मिळालेला उदंड प्रतिसाद आमच्यावरील विश्‍वासाचे प्रतिक आहे असेही बुधवतयांनी सांगितले. यावेळी शेतकरी आणि गाळेधारक होण्यासाठी अर्ज केलेले अर्जदार उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget