टायगर ग्रुपच्या शैलेश बाबावर पोलीसांची धाड; बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह शस्त्रे जप्त


वडूज (प्रतिनिधी) : वडूज येथील बहुचर्चीत व टायगर ग्रुपचा तालुकाध्यक्ष शैलेश रमेश जाधव उर्फ शैलेश बाबा यास बेकायदेशीर विनापरवाना गावठी पिस्तुल, शस्त्रे बाळगल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी काल (गुरुवारी ता. 1) मध्यरात्री अटक केली. 

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश जाधव याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीर शस्त्रे असल्याची तसेच परिसरातील मुली व महिलांना त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे व सहकार्‍यांनी गुरूवारी रात्रगस्ती दरम्यान येथील आयलँड चौका शेजारी कराड-दहिवडी रस्त्यालगत शैलेश जाधव राहत असलेल्या दोन मजली इमारतीच्या वरील खोलीमध्ये तसेच त्याचे संपर्क कार्यालयात व चार चाकी वाहन (एमएच 11 सीजी 8923) याठिकाणी छापा टाकून 2 गावठी पिस्तुल, 5 जीवंत काडतूस, 3 तलवारी, एक सत्तुर, एक गुप्ती, दोन सुरा, 2 कुर्‍हाडी, 5 मोबाईल, 2 लॅपटॉप, दोन चैनी, 2 अंगठ्या, पाच घड्याळे, अशी शस्त्रे, जिवंत काडतुसे अशी 11 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 
शासकीय कामात अडथळा, अरेरावीची भाषा वापरल्याबद्दल तसेच स्वत:ची अटक टाळण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना धक्काबुककी व दुखापत करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शैलश जाधव यास न्यायलायत हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक यशवंत शिर्के करत आहेत. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्यासह हवालदार राजेंद्र जाधव, सतीश कर्पे, पोपट बिचुकले, गणेश कापरे, किशोर भोसले, सागर भुजबळ, वडूजचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे, हवालदार दत्तात्रय जाधव, नितीन निकम, विलास हांगे, सचिन साळुंखे, राहुल मदने, सुहास गाडे, महिला पोलीस हवालदार सविता वाघमारे, नीलम रासकर यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget