Breaking News

दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून तात्काळ उपाययोजना करा -आ.जयदत्त क्षीरसागर


बीड,(प्रतिनिधी)ः सध्या जिल्ह्यासह बीड मतदारसंघात दुष्काळी परिस्थतीमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शेतकर्यांना अशा परिस्थितीत तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. वीज, पाणी या अत्यावश्यक बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन त्याची सोडवणूक तात्काळ करावी अशा सुचना आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आढावा बैठकीत अधिकार्यांना दिल्या आहेत.

शासकिय विश्राम गृहात आ. जयदत्त क्षीरसागर यांनी विविध विभागाच्या अधिकार्यांची आढावा बैठक घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांसंदर्भात अधिकार्यांना सुचना दिल्या. बोंडआळीचे पैसे शेतकर्यांना तातडीने देण्यात यावे तसेच दिवाळीपुर्वी ही नुकसानभरपाई शेतकर्यांना मिळावी. दुष्काळाचे भान ठेऊन योग्य त्या उपायायोजनांकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. ज्या गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी आहे तेथे तातडीने टँकर सुरू करावे. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सनासुदीत धान्य उपलब्ध करून द्यावे. दिवाळी सन असल्यामुळे या काळात भारनियमन करूनये. मतद ारसंघातील ज्या गावात अद्यापपर्यंत ट्रान्सफार्मर बसवले गेले नाहीत तेथे ते तात्काळ बसवून बीड शहरासाठी नव्याने आलेली वीज वितरण प्रणालीची कामे तात्काळ सुरू करण्यात यावी. बीड शहरातील तालुका क्रिडा मैदानाच्या इमारतीसाठी व कंपाउंड वॉलसाठी १ कोटी ८ लक्ष रूपयांचा निधी आला असून याबाबतची निवीदा तात्काळ काढण्यात यावी. गवारी येथील विद्यूत उपकेंद्राची क्षमता दुपटीने वाढवून वीज प्रश्‍नाकडे लक्ष द्यावे. बीड शहरातील विद्यूत केंद्राची क्षमताही वाढवणे गरजेचे असून वीज वितरणकडून ही कामे तात्काळ व्हावीत अशा सुचना देऊन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दुष्काळाचे गांभिर्य लक्षात घेऊन या उपाययोजना कराव्यात असे सांगितले.