Breaking News

न्यायव्यवस्थेवर माझा विश्‍वास : अजित पवार


मुंबई : देशातल्या न्यायव्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्‍वास आहे. यापूर्वीही आपण चौकशीला सहकार्य केले आहे आणि यापुढेही सहकार्य करत राहू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी दिली. सिंचन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केला होता. त्यावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

आपला न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असून यापूर्वीही आपण या प्रकरणी चौकशीला सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहू असे ते म्हणाले. हे प्रकरण सध्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही वक्तव्यामुळे या प्रकरणाच्या तपासणी प्रक्रियेत बाधा येऊ नये याची आपण काळजी घेत आहोत. तसेच आपल्या वकिलांनी तशा सूचना आपल्याला दिल्या असल्याने यावर अधिक बोलायचे नसल्याचे ते म्हणाले. सरकार त्यांचे काम करत आहे. आपण केवळ खालून आलेल्या फाईलवरच सह्या केल्या होत्या असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.