लोकशाही विचार मंचच्या वतीने संविधान दिन साजरा


नेवासा/प्रतिनिधी
विद्या, शील व स्वाभिमान या मूलमंत्राने जगणारे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्वांना लोकशाही अधिकार दिला. त्यामुळे त्यांचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी प्रा.डॉ. अशोक शिंदे यांनी केले. कॉग्रेसचे कमिटीचे तालुका शहराध्यक्ष संजय सुखधान यांच्या लोकशाही विचार मंचच्या वतीने नेवासा शहरात एक शाम संविधान के नाम हा सुरेल गीतांचा कार्यक्रमाचे व 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्यातील निधन झालेल्यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नेवासा येथील नगरपंचायत चौकामध्ये आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन 26/11 च्या हल्ल्यात शाहिद झालेल्यांना शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व श्रद्धांजलीचे गीत गाण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक संजय सुखधान यांनी प्रास्ताविक केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, चंद्रकांत काळोखे,उपनगराध्यक्ष नंद्कुमार पाटील,नगरसेवक शालिनीताई सुखधान, नगरसेवक रणजीत सोनवणे, दिनेश व्यवहारे, राजेंद्र मापारी,सुनील वाघ,दत्तात्रय बर्डे,सचिन नागपुरे, डॉ. सचिन सांगळे,भारत डोकडे, सतीश पिंपळे, राष्ट्रीय कुस्ती पंच संभाजी निकाळजे, भास्करराव लिहिणार, गोविंदराव ब्राम्हणे, उदयराज करडक, अविनाश गाढवे,विलास शिरसाठ, जेष्ठ व्यापारी विजय गांधी आदी मान्यवर हजर होते. यावेळी बोलताना प्रा.अशोक शिंदे पुढे म्हणाले की लहान मोठ्या सर्वांना भारतामध्ये एक डोके, एक मत हा अधिकार संविधानाद्वारे देणार्‍या आंबेडकरांचा लोकशाहीवर प्रचंड विश्‍वास होता. यासाठी त्यांनी सर्वच राज्यघटनांचा अभ्यास केला होता. जाती निर्मुलनासाठी व मागासवर्गीय जनतेमध्ये शिक्षणाचे महत्व वाढावे यासाठी त्यांनी केलेले कार्याचे सर्वच समाजाने स्मरण करणे व त्यानुसार वागणे ही काळाची गरज आहे. यावेळी विष्णू नाना इंगळे, विल्यम गायकवाड, रविंद्र पिंपळे, सचिन पवार,अजय त्रिभुवन, विशाल शिनगारे, निखिल चंदानी, विशाल जाधव, सतीश शेरे, अनिल चव्हाण, पोपटराव शेकडे, विजय शेरे, मुजावर ईनामदार, शाहरुख सय्यद, सलमान शेख यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधानाचे रक्षण करणे ही बहुजन समाजाची जबाबदारी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात बहुजन समाजातील अठरा पगड जातींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून संविधानाचे रक्षण करणे ही तमाम बहुजन समाजाची जबाबदारी असून संविधानाला धक्का देण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास प्रतिकार करण्याची तयारी ही सर्व बहुजन समाजातील अठरा पगड जातींच्या बांधवांनी ठेवली पाहिजे..
संजय सुखधान

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget