Breaking News

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाविरुद्ध गुन्हा

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी) : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून न्याय व्यवस्था व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा विरुद्ध पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान न्यायालयाने आरोपीस पंधरा दिवस शहराबाहेर राहण्यासह सशर्त जामिनावर सुटका केली. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गोविंद बापूराव झोरे यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबूक अकाउंटवर हम कोर्ट की नही मानेंगे व ज्यांच्या अंगात राष्ट्रद्रोही मुस्लिमांचे रक्त असेल तेच मंदिराला विरोध करतात. अशी कॉमेंट टाकून न्याय व्यवस्था व मुस्लिम समाजाची बदनामी करून भावना दुखावल्या. सदर प्रकारानंतर जहीर खान जिलानी खान पठाण रा. भोई गल्ली देऊळगाव राजा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गोविंद बापूराव झोरे यांच्याविरुद्ध न्याय व्यवस्था व मुस्लिम समाजाची बदनामी करून भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला दरम्यान आज गुरुवारी पोलिसांनी आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन आठवडे शहरा बाहेर राहून जालना सदर बाजार पोलीस स्टेशनला खंड न पडता हजेरी लावण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नीता गायकवाड तपास करीत आहे.