कॉ.भोसले यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार


बीड (प्रतिनिधी) दि.३ .भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बीड तालुका कार्यकारिणी सदस्य कॉ. अण्णासाहेब भोसले यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त खडकी(घाट) येथील ग्रामस्थांकडून पुष्पहार व निजामशाही विरोधात कम्युनिस्टांचा लढा हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की,कॉ.अण्णासाहेब भोसले यांचा ७९वा वाढदिवसखडकी (घाट)येथील ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा करत कॉ. अण्णासाहेब भोसले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए आय एस एफ चे जिल्हा उपाध्यक्ष कॉ.दत्त भोसले यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच मा. नितीन गिरी हे होते. कॉ. अण्णासाहेब भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खडकी ग्रामस्थांकडून माझा सत्कार होत आहे ही, माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोस्ट आहे. मी आज ४०वर्षांपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करत आहे.पक्षाचे काम करत असताना कधीच लबाडी केली नाही. सतत गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी लढत राहिलो. अनेक ठिकाणी मोर्चे- आंदोलने ,६-६ महिने जेल भोगली पण काम सोडले नाही. कम्युनिस्ट हे संघर्षाचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या वेळी, गावचे सरपंच- नितीन गिरी, उपसरपंच-महारुद्र वाघ, माजी सरपंच-बाबासाहेब तावरे, विक्रम (अण्णा) भोसले,शहाजी (काका)भोसले, साहेबराव वाघमारे, सीताराम भोसले, आदी. मान्यवर मंचावर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget