शासनाच्या आधारभुत खरेदीकेंद्राचा लाभ घ्या : आव्हाड


जामखेड/प्रतिनिधी 
शासनाने उत्पादन खर्चाच्या दिडपट शेतीमालाला अधारभुत हमीभाव दिला असल्याने शासनाच्या आधारभुत खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन पं.स.सभापती सुभाष आव्हाड यांनी जामखेड येथील मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले. पुण्यश्‍लोक कृषी प्रक्रिया सह. संस्था मर्यादित जामखेड तालुका संचालित पहिले मुग, उडीद व सोयाबीन या खरेदी केंद्राचे उद्घाटन दि 1 रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष आव्हाड बोलत होते. या वेळी गौतम उतेकर, डॉ ज्ञानेश्‍वर झेंडे, डॉ. भगवान मुरुमकर, रवी सुरवसे, हनुमंत पाटील, महेश निमोणकर, अमित चिंतामणी, ऋषिकेश बांबरसे, गणेश आजबे, मोहन पवार, शाकीर शेख, फीरोज कुरेशी, पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, केशव वणवे, सदाशिव मुरुमकर, शिवाजी डोंगरे, नागराज मुरुमकर, ईश्‍वर मुरुमकर, राजु वारे, शहाजी राऊत, सरपंच गणेश जगताप, विठ्ठल राळेभात, सचिन भंडारी मनोज कुलकर्णी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की सध्या तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन शासनाच्या या हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकर्‍यांना एक दिलासा मिळाला आहे. व्यापार्‍यांनाडी माल घेऊन गेल्यावर शेतकर्‍यांची हेंडसाळ होते. त्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात प्रथम हे हमीभाव खरेदी केंद्र पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरु केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांकडे न जाता आपला माल खरेदी केंद्रात घालावा. आतापर्यंत 4900 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच ही मुदत शासनाने वाढवली असुन 15 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. नाफेड मार्फत सुरू करण्यात आलेली मुग, उडीद व सोयाबीनसाठी एकरी एकच क्विंटलची नोंद करण्याचा आदेश आल्याने बाकी उत्पादन मातीमोल किंमतीला शेतकर्‍यांना विकावे लागणार आहे. त्यामुळे एका एकरसाठी 4 क्विंटल ची नोंद करावी अशी मागणी शेतकर्‍यांकडुन होत आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget