Breaking News

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या


इंदापूर (प्रतिनिधी)ः छत्रपती साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. स्वतःवर गोळी झाडून घेतल्यांनतर त्यांना तातडीने बारामतीच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय होते. पवार रुग्णालयात पोहोचले होते. 

निंबाळकर यांनी चार-पाच दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती साखर कारखान्याचा कार्यभार स्वीकारला होता. आज दुपारी त्यांनी निंबाळकर यांनी स्वत: वर गोळी झाडून घेतली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली होती. राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी संचालकांना अध्यक्षपदासाठी निंबाळकर यांच्या नावाची शिफारस पवार यांनी केली होती. त्यानंतर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. लक्ष्मण शिंगाडे यांनी सूचक म्हणून अध्यक्षपदासाठी निंबाळकर यांचे नाव सुचवले. अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने निंबाळकर यांची निवड बिनविरोध झाली होती.