राष्ट्रवादीकडून मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट


बुलडाणा,(प्रतिनिधी): बुलडाणा शहरातील पथदिवे, स्मशानभूमी, पाणी पुरवठा व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यात नगर पालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. या निषेधार्थ 6 नोव्हेंबर रोजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट देण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात शहराच्या मुख्य मार्गावरील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील जुनगाव, भिलवाडा, मिल्ट्री प्लॉट, भडेच ले आऊट, डॉ. आंबेडकर नगर, जुने ग्रेन मार्केट परिसर, भिम नगर, सुवर्ण नगर, गणपती परिसर, इंदिरा नगर यासह इतर प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक दिवसापासून नाल्याची साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. 

शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे धरणात पाणी असूनही नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. इकबाल चौकातील स्मशानभुमीची दुरवस्था झाली आहे. या समस्यांचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. याचा निषेध म्हणून आज दिवाळी सणाचे औचित्य साधून मुख्याधिकार्‍यांना काळ्या रंगाचा आकाश कंदील भेट देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल बावस्कर, नाजीमाताई खान, सुरेंद्र जवरे, संदीप घुले, महेश देवरे, मनोज चंदन, बबलू कुरेशी, नईम कुरेशी, आशिष खरात, किशोर सुरडकर, प्रशांत जाधव व राजेश गवई यांची उपस्थिती होती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget