किसन वीर यांच्या कार्याला जिल्हा बँकेत अभिवादन


सातारा (प्रतिनिधी) : भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून व गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती देण्यास तत्पर असलेल्या सातारा जिल्ह्याच्या भूमीपुत्रांनी स्वातंत्र्याचा विडा उचलला होता आणि याकामी क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण या सारख्या बिनीच्या शिलेदारांनी ब्रिटीश सरकारला हैराण करून सोडले. येरवडा तुरूंगातून किसन वीरांनी यशस्वी पलायन केलेल्या घटनेला 1 नोव्हेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण झाली. या अमृत क्षणांच्या ऐतिहासिक नोंदीला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीनेे विनम्र अभिवादन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सामाजिक, ग्रामीण व कृषी विकासाच्या पूर्णत्वासाठी आबांनी सातारा जिल्हा बँकेची मुहूर्तमेढ रोवली. शूरवीरांचा, क्रांतीकारकांचा सातारा जिल्हा ग्रामीण, कृषी व सहकारात सुजलाम, सुफलाम करण्याचे नेटके प्रयत्न केले व त्यास यशही प्राप्त झाले. 

या देशाशी व मातीशी एकनिष्ठ राहून सेवा केली तर पुढच्या अनेक पिढया सुखी होतील हा यशाचा मूलमंत्र आबांनी दिला. आबांच्या या नितांत देशभक्तीपर कार्याला सातारा जिल्हा बँकेच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक एस. ़़एन. जाधव व व्यवस्थापक ़सुजित शेख यांनी बँकेच्यापोवई नाका येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र इमारतीच्या प्रांगणातील आबासाहेब वीर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमास आनंदराव शिंदे, विभागीय विकास अधिकारी आनंदराव जाधव, अधिकारी विश्वजीत राजुरकर, राहुल डेरे, बँक सेवक यांनी फुले वाहून अभिवादन केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget