Breaking News

उरमोडीच्या पाण्यासाठी ढाकणी येथे रास्ता रोको


म्हसवड (प्रतिनिधी) : म्हसवड ढाकणी तलावात उरमोडीचे पाणी पिण्यासाठी सोडण्यात यावे, या मागणीसाठी ढाकणी व परिसरातील ग्रामस्थांनी म्हसवड मायणी रस्ता सुमारे दोन तास रोखून धरत प्रशासनाचा निषेध केला. शेकडो ग्रामस्थांनी या रस्तारोको आंदोलनात सहभाग घेतला होता.

सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सातारा यांना दि. 30 आक्टोबर रोजी ग्रामस्थांनी पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊन ढाकणी तलावात उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी साठा उपलब्ध न झाल्यास दि. 05 नोव्हेंबर रोजी ढाकणी येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको नंतरही पाणी तलावात न आल्यास ग्रामस्थांच्यावतीने दि. 12 रोजी दहिवडी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.