भाजप सरकारचा भोंगळ कारभारःपवारपुणेः निवडणुका जवळ आल्या, की चुनावी जुमले सुरू होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला 59 मिनिटांत एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतके कर्ज कसे देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरू आहे. सत्तेत आल्यावर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. 

पिंपरीत नेत्यांना मंत्रिपद, महामंडळ याची आमिषे दाखवली होती; पण काय मिळालं तुम्हाला दिसते आहे. भाजप सरकार बनवाबनवी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यामागे भाजपचे राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. त्यांना समाजात धृवीकरण करायचे आहे. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपला राम आठवतो, अशी टीका त्यांनी केली. 

पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू होती. त्याव पवार यांनी टीका केली. हुकूमशाही पद्धतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत. शिवसेना थेट भाजपवर विखारी टीका करते आहे, तरी भाजप नेते शांत आहेत. काल झालेल्या बैठकीत 48 जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचे एकमत झाले आहे. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले, तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत असे पवार म्हणाले.

आता ज्या जागांवर एकमत झालं आहे,, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का, यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असे सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसेबद्दल चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील, असे सांगून मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे गाजर दाखवण्याच काम आहे. जे सत्तेला हपापले आहेत. त्यांना गाजर आहे. भाजप शिवसेनेची आघाडी झाली किंवा नाही तरी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार. गेल्या वेळेस युती नसल्याने त्याची किंमत सर्वांना मोजावी लागली असे पवार म्हणाले.

जालन्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार
जालन्यामध्ये मुख्यमंत्री दौर्‍यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनादेखील पोलिसांनी मारहाण केली आहे. राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget