Breaking News

कृ.उ.बा.बाजार समितीच्या कर्मचार्‍याचे आमरण उपोषण


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- मागील अनेक वर्षांपासून येथील कृ.उ.बाजार समितीच्या कर्मचार्‍यावर अन्याय होत असुन त्यांच्यावर ऐन दिवाळीत तीसर्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.

येथील बाजार समितीत कायम स्वरुपी केवळ तीनच कर्मचारी असताना हंगामी नऊ कर्मचारी आहेत परंतु या कर्मचार्‍यावर कामाचा भार असताना व सहकार मंत्री, जिल्हा निबंधक यांचे आदेश असताना देखील यांच्यावर मागील अनेक वर्षांपासून यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे. यापूर्वीही अनेक दिवस या कर्मचार्यांनी आमरण उपोषण केली आहेत त्यांच्या उपोषणा वेळी त्यांना आश्वासने दिली होती मात्र प्रत्यक्षात त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. बाजार समिती सभापती कर्मचार्‍यावर अन्याय करीत आहेत अशी भावना उपोषण कर्त्यांची असुन त्यांना तात्काळ पगार सुरु व्हावा या मागणीसाठी दिनांक २९ पासुन या कर्मचार्यांनी तिसरे आमरण उपोषण सुरू केले आहे.