Breaking News

रेशन दुकानावर रेशन देण्यास टाळटाळ केल्यास शिवसंग्रामशी संपर्क साधा-तांबे


बीड (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असुन यातच दिवाळीसारखा मोठा सन आहे. बीड तहसिल कार्यालय व पुरवठा विभागाने धान्याची सहा हजार किवटलची कपात केली असुन ऐन दिवाळीत गोर गरीब जनतेला उपासमारची वेळ आली आहे. ज्या रेशन दुकानावर धान्य मिळणार नाही अशा दुकानदाराची तक्रार शिवसंग्राम कार्यालय येथे करावी असे आवाहन शिवसंग्रामचे सौरभ तांबे यांनी केले आहेे. 

बीड तहसिल व पुरवठा विभागामध्ये सावळा गांधळ चालु आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर धान्य कपात करून तहसिल व पुरवठा अकलेचे तारे तोडले आहेत. कायदा आणि नियमाच्या आड राशन दुकानदारांन कडून गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम चालु आहे. या प्रकारास शिवसंग्राम प्रमुख विरोध करत आहे. तरी जनतेश दिवाळीसाठी धान्य वितरीत करावे. तरी राशन दुकानदाराकडून रेशन देण्यास टाळाटाळ केल्यास शिवसंग्राम पदाधिकार्‍यास संपर्क साधा असे आवाहन सोैरभ तांबे, पंकज धांडे, हरीश शिंदे, संदीप मोर, सुनिल धायजे, किशोर मुंडे यांच्या कडून करण्यात आले.