प्रतिस्पर्ध्यास विरोध करेण एवढाच उद्योग : काकडे;


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यामध्ये तीन जिल्ह्यात नाही असा शेतकर्‍यांच्या उन्नती साठी मोठा कारखाना उभा राहतोय, हे तर खर शेवगाव तालुक्याच्या दृष्टीने नव्हे तर, जिल्ह्याच्या दृष्टीने एक अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आ.मोनिका राजळे यांना शेतकर्‍यासाठी असलेल्या कारखान्याविषयी असलेली उदासीनता दिसुन येते. राजळे यांना शेतकर्‍याविषयी पुतना मावशीसारखा कळवला असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीमध्ये शेवगाव तालुक्यामध्ये हर्षदा काकडे यांनी देखभाल दुरुस्तीच्या कामांना मंजुरी घेतली आहे .त्या मध्ये एकनाथ आयुर्वेद विद्यालय व जनशक्ती टेक्स्टाईल मिल्स, जनशक्ती नगर तसेच गोळेगाव येथील बर्डे वस्ती, शिववस्ती, जोतीबा वस्ती या ठिकाणी देखभाल दुरुस्ती मधून पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्याचे सूचक हर्षदा काकडे व अनुमोदक सुनिल गडाख हे आहेत . 

आ. मोनिका राजळे व तिच्या बगलबच्चाना काही माहिती नसताना फक्त समोरच्या प्रतिस्पर्ध्याला विरोध करणे एवढाच त्यांचा उद्योग आहे . तालुक्याच्या पूर्वभागातील तीन पिढ्या पासुन वंचित राहिलेल्या ताजनपुर लिफ्टच्या प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी हर्षदा काकडे यांनी दोन ते अडीच हजार महिलांसह औरंगाबाद येथे गोदावरी कृष्णा खोरे महामंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता झपके यांचेकडून 450 कोटींची ताजनापूर लिफ्ट ही योजना मंजूर करून घेतली, परंतु त्या योजनेतून चार वर्षात वीस गावांना पाण्याचा एक थेंबही मोनिका राजळेनां या गावाना देता आला नाही. हर्षदा काकडे या पाणी देणार्‍याच आहेत, पाणी चोरणार्‍या नाहीत. उलट 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे विद्याधर काकडे यांचे तिकीट मोनिका राजळे यांनी चोरून नेले. तरी काकडे दाम्पत्यांनी त्यांना मोठ्या मनाने विधानसभेत पाठवले याची त्यांनी थोडी सुद्धा जाणीव ठेवली नाही. अशा चोरांना 2019 च्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार ठाम नाही. असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या खोट्या बदनामी बाबद आ.मोनिका राजळे व त्यांच्या बगबच्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा विचार आमच्या वार्ताहरांशी बोलताना हर्षदा काकडे यांनी व्यक्त केला .

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget