सिरस पारगाव हद्दीत वनविभागाच्या आशिर्वादाने विना पारगाव सुरू लाकडी कारखाना


बीड, (प्रतिनिधी) : वन विभागाचा काळाबाजार चव्हाट्यावर आला असून वन अधिकारी अमोल सातपुते हे सतत उर बडवून आपण किती स्वच्छ प्रतिमेचे आहोत, असा भासवण्याचा प्रयत्न करतात. बीडपासून आठ कि.मी. अंतरावर असणार्‍या सिरस पारगाव हद्दीत विना परवाना लाकडी कारखाना सुरु असून, बिंनधास्तपणे चालणार्‍या या कारखान्यावर कोण मेहेरबान आहे, हे जाहिर झाले असून ठाणे येथून स्थलांतर होवून हा कारखाना सिरस पारगाव हद्दीत वन विभागाच्या परवान्याशिवाय सुरु आहे. याची माहिती कर्तव्यदक्ष वन अधिकारी अमोल सातपुतेंना नसावी. याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. संबधीत माहिती कळाल्यानंतर वन विभाग या कारखान्यावर कारवाई करतो का? अर्थपूर्ण व्यवहारामुळे कारखानदारांवर मेहरबान होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

खासबाग येथील वन विभागाच्या कार्यालयात बसून गप्पा ठोकणारे वन अधिकारी अमोल सातपुते फक्त कार्यालयातच बसून असतात का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सिरस पारगाव हद्दीमध्ये ठाणे येथून स्थलांतर होवून लाकडी कारखाना आला आहे. या कारखान्यामध्ये उभी व आडवी आरा मशीन असून वन विभागाच्या परवानगीशिवाय हा कारखाना सुरु असून आतापर्यंत वनविभागाने या कारखान्याला परवानगी दिली नसल्याचे माहिती पुढे आली आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर कारखाना सुरु असून याकडे वन विभाग अधिकार्‍यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. वन अधिकारी सातपुते कर्तव्यदक्ष असल्याचा दावा फोल ठरत आहे. हा लाकडी कारखाना कोणाच्या मर्जीवर चालत आहे. याची चौकशी होणे आवश्यक असून परवाना नसताना महावितरणने विज कनेक्शन कसे दिले? हाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget