शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख पदी आप्पासाहेब जाधव


माजलगाव(प्रतिनिधी):- शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये आणि मराठवाड्याचे नेते खा.चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या विनंतीवरून शिवसेना माजलगाव तालुकाप्रमुख पदी तरुण तडफदार शिवसैनिक आप्पासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकानूसार आप्पासाहेब जाधव यांची निवड झाल्याने संपूर्ण माजलगाव मतदारसंघात जल्लोषासह नवचैतन्याची लहर निर्माण झाली आहे.

गेली अनेक महिने रिक्त असलेल्या माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुख पदी अपेक्षितपणे आप्पासाहेब जाधव यांची निवड झाली. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत झाले असून कार्यक्षम व तरुण तडफदार नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या आप्पासाहेब जाधव यांच्या नियुक्तीमुळे निष्ठावंत शिवसैनिक व तरुण वर्गात नवचैतन्य दिसून येत आहे. आप्पासाहेब जाधव यांच्या रुपाने तालुक्याला सक्षम तालुकाप्रमुख मिळाल्याने शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजलगाव शहर तसेच ग्रामीण भागातूनही आप्पासाहेब जाधव यांच्या नियुक्तीमुळे आनंद व्यक्त केला जात आहे. आप्पासाहेब जाधव यांच्यासह वडवणी तालुकाप्रमुख पदी संदीप माने, धारुर तालुकाप्रमुख पदी बाळासाहेब कुरूंद, उपजिल्हाप्रमुख पदी रामराजे सोळंके, माजलगाव शहरप्रमुख पदी धनंजय सोळंके, माजलगाव विधानसभा संघटक पदी डॉ.उध्दव नाईकनवरे, माजलगाव तालुका पदी समन्वयक अशोक आळणे, तालुका समन्वयक पदी तुकाराम येवले, जिल्हा सहसंघटक मच्छिंद्र काळे आदींनाही जबाबदारी देण्यात आली आहे. आज ठिकठिकाणी आप्पासाहेब जाधव यांचे सत्कार सोहळे झाले. शिवसैनिकांनी फोटके फोडून, पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget