मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

खंडाळा : किरकोळ अपघाताच्या कारणातून पारगाव येथील हॉटेल मयूरचे चालक व मॅनेजर यांना मारहाण करून चेन व 31 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच हॉटेलमधील साहित्याच तोडफोड करत दहशत माजवली. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 

पारगाव-खंडाळा बसस्थानकाशेजारी मयूर हॉटेलसमोर फिर्यादी सुधीर प्रकाश जाधव हे स्कॉर्पिओ गाडी हॉटेलकडे डाव्या बाजूस वळवत होते. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीची गाडीला धडक झाली. या रागातून दुचाकी चालक विकी मिसाळ व सूरज सपकाळ यांनी सुमित गायकवाड, सनी छपरी, संतोष माने, अशोक साळवी व अन्य दोन साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर या सर्वांनी हॉटेलचालक सुधीर जाधव व मॅनेजर संजय सखाराम भारमल यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget