Breaking News

सातार्‍यात दोन ठिकाणी विनयभंगाच्या घटना


सातारा (प्रतिनिधी) : सातारा शहरासह तालुक्यात विनयभंगाच्या दोन घटना घडल्यानंतर तासगाव येथे राडा झाल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत सातारा बसस्थानकानजीक प्रशासकीय इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेची छेड काढून विनयभंग केला, तर दुसर्‍या घटनेत व्हॉटस्‌ऍपवर मेसेज का केला? या कारणातून तासगाव (ता. सातारा) येथे तुंबळ हाणामारी झाली. 

याप्रकरणी मारामारी व विनयभंग, सायबर ऍक्टसह परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.