बाबासाहेब बोडखे यांची विशेष कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती


अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब पांडूरंग बोडखे यांची महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बोडखे यांनी महाविद्यालयीन कार्यकाळापासून आजपर्यंत सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रेरणादायी समाजकार्य केलेले आहे. महाविदयालयीन शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील मुला-मुलीच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या. संघर्षमय जीवन जगत असताना गोरगरीब, सामान्य जनेतेच्या व विविध शैक्षणिक प्रश्‍नासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांनी अनेकदा आंदोलने केली. शिक्षकांचे विविध प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. दिव्यांग व मतीमंद मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

बोडखे यांची विशेष कार्यकारी आधिकारीपदी निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे आ.अरूणकाका जगताप, आ.संग्रामभैय्या जगताप, आ.शिवाजीराव कर्डीले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा.सुनिल पंडीत, शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक झिने, रात्रशाळा संघटनेचे प्रमुख प्रा.सुनिल सुसरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget