सहकाराची ताकद दाखवून देणार : मदन भोसले


खंडाळा (प्रतिनिधी) : आज चित्र काहीसे उलट दिसत असले तरी एक काळ असा होता, की त्या काळात खासगी साखर कारखाने सहकारात आणले गेले. त्यासाठी तत्कालीन नेतृत्वाने व्यापक हिताचा विचार केला. ते करत असतानाच सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजावलीत यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचा होम केला. देशभक्त आबासाहेब वीर यांनी येरवडा तुरुंग फोडला त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाली. याच आबांनी रुजवलेल्या सहकाराची शाखा म्हणजे किसन वीर खंडाळा कारखाना आहे. याच सहकाराची पाळेमुळे घट्ट ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. ती पार पाडण्यासाठी सहकाराची ताकद दाखवून देण्यासाठी तिनही कारखान्यांचे हंगाम यशस्वी करणारच आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून शेतकर्‍यांनी स्वत:च्या मालकीच्या संस्थेच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.

किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाचा सन 2018-19 च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, व्ही. जी. पवार, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, मोहनराव भोसले उपस्थित होते.
मदनदादा भोसले पुढे म्हणाले, खंडाळा कारखाना उभारणी करताना काही तांत्रिक अडचणी तर काही मानवनिर्मित अडचणी होत्या. या सर्व अडचणींवर मात करीत आज आपल्या कारखान्याचा तिसरा बॉयलर अग्नि प्रदिपन कार्यक्रम होत आहे. सहकाराची ताकद फार मोठी आहे. सर्वसामान्य शेतकरी मालक करण्याची किमया या सहकाराने केली. त्यामुळे सर्वांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन कष्टकरी शेतकरी, कामगार यांचे हित लक्षात घेऊन सहकारातील हे मंदिर टिकवले पाहिजे. यंदाच्या वर्षी साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. यावर उपाय म्हणुन केंद्र शासनाने साखरेचे किमान दर दोन हजार नऊशे रूपयांच्याखाली न येऊन देणे व इथेनॉलनिर्मितीचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून यासाठी केंद्र व राज्य शासनाचे त्यांनी अभिनंदन केले. दूरवरच्या कर्मचार्‍यांची निवासाची गैरसोय होऊ नये म्हणुन व्यवस्थापनाने सर्व सोयीनीयुक्त अशी अभिनव निवास व्यवस्था केली असून त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, असेही भोसले यांनी सांगून सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. व्ही. जी. पवार, गजानन बाबर, शंकरराव गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सभासदांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन संचालक नंदकुमार निकम यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget