नवजात बाळाला रस्त्यावर दिले टाकुन; मुंग्यानीं घेतला चावा


बीड, (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील सारुळ फाट्याजवळील रस्त्यावर टाकुन दिलेल्या अवस्थेत पुरुष जातीचे नवजात बाळ आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. केज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाळाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. पाढर्‍या कपड्यात गुंडाळूंन ठेवलेल्या नवजात बाळाला ठिकठिकाणी मुंग्यानीं चावा घेतल्याचे दिसुन येत आहे. केज तालुक्यातील जोला शिवार सारुळ फाट्याजवळील रस्त्यावर काल सकाळी पुरुष जातीचे नवजात बाळ फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले.त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

१०८ रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन नवजात बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदरील बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड लाईनचे शेख तय्यब हे देखील जिल्हा रुग्णालयात आले होते. उपचारानंतर बाळाला औरंगाबाद येथील शिशूगृहात घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget