बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन


 बुलडाणा,(प्रतिनिधी): बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेवर करण्यात आलेला लाठीचार्ज व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, इव्हीएम मशीन, एससी व एसटी समाजावर होत असलेले अत्याचारा विरोधात तसेच संविधान व लोकतंत्र बचाव अभियानांतर्गत 4 नोव्हेंबर रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवरील आंबेडकर नगरातील तीन पुतळ्याजवळ हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संविधान जाळणार्‍याचा निषेध करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर शहर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी दिलेल्या दिलेल्या निवेदनामध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित परिवर्तन यात्रेचा समारोप अहमदाबाद येथे करण्यात येणार होता. परंतु या कार्यक्रमाला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे शांततेने आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ तसेच आगामी होणार्‍या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येवू नये. तसेच मागील काही वर्षापासून एससी व एसटी समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. या समाजावरील होणारा अन्याय दूर करण्यात यावा. तसेच खासगीकरणाच्या विरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget