Breaking News

वर्षावास,भिक्खु संघदान सोहळ्याची जय्यत तयारी-भन्ते धम्मशिल


बीड, (प्रतिनिधी)ः-बीड जिल्ह्यात बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे.याकरिता गेल्या तीन महिन्यापासून शहरात भिक्खु धम्मशिल यांचा ६ वा वर्षावास सुरू आहे. या वर्षावासाच्या समापनानिमित्त भिक्खु संघदान सोहळ्याचे बीड शहरात रविवार (दि.४) नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी तब्बल शंभर भन्तेंसह राज्यभरातून जनसागर लोटणार आहे.त्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. 

हा सोहळा सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे.असल्याची माहिती सोहळ्याचे संयोजक भन्ते धम्मशिल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. रविवार (दि.४) नोव्हेंबर रोजी बीड शहरात होत असलेला वर्षावास समापन व भिक्खु संघदान सोहळ्याच्या जय्यत तयारीची व ऐतिहासिक क्षणांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी भन्ते धम्मशिल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या माहितीसाठी पत्रकारांशी संवाद साधताना भेन्ते धम्मशिल म्हणाले की, हा सोहळा भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात संपन्न होतो आहे.