शेतकर्‍यांना शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय दिवाळी सण साजरा करता येणार नाही.


शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना दुष्काळामुळे शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय दिवाळी सण साजरा करता येणार नाही. असे चित्र स्पष्ट दिसत आहे. सण 2017 या वर्षात शेवगाव तालुक्यातील पांढरे सोने म्हणजे कापूस शेतकर्‍यांच्या पदरात पडला नाही. बोंड आळीने कापूस पिक पुर्णपणे हाती आलेले वाया गेले. सन 2018 या वर्षात निसर्ग अवकृपेने कापसाचे पिक येण्याआगोदरच पावसाआभावी जळून गेले. शेवगाव तालुका म्हणजे कापसाचे आगार म्हणून राज्यात प्रसिध्द आहे. पांढरे सोने कापूस विकून दरवर्षी शेतकरी दिवाळी साजरी करीत असे. शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍याच्या कुटूंबाची दिवाळी आनंदात साजरी होत होती. त्याच शेतकर्‍यांवर आज दिवाळी साजरी न करण्याची वेळ निसर्गाने आणलेली आहे. 

10 ऑक्टोबर या दिवसी पावसाचे चित्रा नक्षत्र होऊन कोरडे गेले. पुढे 24 ऑक्टोबर रोजी स्वाती नक्षत्रास प्रारंभ झाला. हे नक्षत्र सुध्दा कोरडेच गेल्याचे दिसत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यासमोर पशुधन जगविणे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी शासनाने जनावरांच्या छावण्या सुरु कराव्यात किंवा दावणीवर चारा वाटप करावा अशी शेतकर्‍यांची एक मुखी मागणी आहे. शेवगाव तालुक्याच्या पुर्व भागातील खरीपाची पिके पावसाआभावी पुर्णपणे जळून गेलीत आणि रब्बीची पेरणी झालेलीच नाही. आता मात्र 100 टक्के पाऊस येण्याची आशा मावळलेली आहे. माणसाच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अतिशय गंभीर निर्माण झाला आहे. त्यातच दुष्काळातच तेरावा महिना उजडला आहे. हुमणी अळीने ऊसाचे पिकाचे उत्पन्न 50 टक्क्याने घटणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार घडला आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्येस राज्यशासनच जबाबदार...
शेवगाव शासनाने शेतकर्‍यांसाठी 100 टक्के दुष्काळी निधी द्यावा. व शेतकर्‍याला आर्थिक संकटातून बाहेर काढावे. भारत देशातील शेतकरी हा अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शरद सोनवणे धरणग्रस्त पट्टयातील लाखेफळ, एरंडगाव, खुंटेफळ या भागातील पाण्याअभावी ऊसाची पिके जळून चालली आहेत. खरीपाची पेरणी झालेली पिके पावसाआभावी जळून गेलेली आहेत. शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत न दिल्यास शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारतील यास राज्यशासनास जबाबदार धरले जाईल.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget