Breaking News

ठाण्याच्या कामगार रुग्णालयाच्या स्टोअर रूमला लागली आग; जुने केसपेपर जाळून खाक


ठाणे : प्रतिनिधी

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील कामगार रुग्णालयाच्या स्टोररूमला सोमवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशमन दल एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर घेऊन पोहचले. त्यांनी अआगीवर नियंत्रण मिळवले. आगीत जुने केसपेपर व इतर साहित्य जाळून खाक झाले.


सोमवारी सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट भागात असलेल्या कामगार रुग्णालयाच्या स्टोररूमला लागलेल्या आगीत स्टोर रूममध्ये असलेल्या जुन्या केसपेपर आणि भंगारात टाकलेले काही साहित्य जळाले. यामुळे आता कामगार रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आगीच्या दाहकतेने खिडक्यांच्या काचा फुटल्याने आगीला वेळीच आटोक्यात आणले नसते तर मात्र परिस्थिती बिकट झाली असती. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नसून अग्नीशमन दल अधिक तपास करीत आहे.