Breaking News

सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये साजरा होणार आज विद्यार्थी दिवस


सातारा (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी जिल्हा परिषद सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश घेवून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्यावतीने उद्या 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस सकाळी 10.30 प्रतापसिंह हायस्कूल येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधिश डॉ. यशवंत चारे प्रमुख पाहुणे असणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश क्षीररसागर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला विद्या व्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला. 

त्याची आठवण म्हणून विद्यार्थी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रा. प्रकाश कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती, पदाधिकारी-अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.