चंद्रपूरमध्ये दारु तस्कराने फौजदाराला चिरडले


चंद्रपूर (प्रतिनिधी) ः चंद्रपूरच्या मौशी-चौरगावजवळ अवैध दारुची वाहतूक करणार्‍या स्कॉर्पिओ चालकाने गाडी अडवणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाच्या अंगावर भरधाव गाडी घातली. यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. छत्रपती चिडे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

स्कॉर्पिओ गाडीतून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती नागभीड पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागभीड पोलिस मौशी-चोरगावजवळ गोसी खुर्द कालव्याजवळ दबा धरून बसले होते. पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडेंसह इतर कर्मचार्‍यांनी स्कॉर्पिओला थांबवण्याचा प्रयत्न केला. स्कॉर्पिओ न थांबल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी तस्कराची गाडी ट्रकला धडकली. पोलिस या तस्कराला पकडायला पुढे गेले. त्याचवेळी स्कॉर्पिओ चालकाने चिडे यांच्यासह इतर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. चिडे या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी चिडे यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget