थोरात उद्योग समुहाने दुध दर फरक जाहिर करून जोपासले शेतकर्‍यांचे हित


संगमनेर/प्रतिंनिधी
मागील 24 वर्षाच्या परंपरेप्रमाणे एस.आर.थोरात दूध उद्योग समूहाचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी 1 ए प्रिल 2017 ते 31 मार्च 2018 ह्या आर्थिक वर्षामध्ये तालुक्यातील स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकयांनी थोरात उद्योग समुहास स्वच्छ निर्भळ व चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा केलेल्या दुधास दूध दर फरक जाहीर करून तालुक्यातील शेतकर्‍यांचे हित जोपासणारी कामधेनु अशी परंपरा कायम ठेवली आहे. शेतकर्‍यांना दूध दर फरका बरोबर दूध पेमेंट,वाहतूक पेमेंट दूध वितरक कमिशन, कर्मचारी पगार बोनस, सभासद लाभांश असे एकत्रित 14 कोटी 38 लाख रुपयांचे पेमेंट संबधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

 सन 2017-18 या वर्षामध्ये देशातील तसेच परदेशातील बाजारात दुधाला फार कमी दर मिळत आहेत तरी सुद्धा उद्योग समूहाने 3.5/8.5 प्रतीच्या दुधास 25/- दर दिला आहे. चालू वर्षी जून पासून पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिति निर्माण झाली आहे ह्या परिस्थिति मध्ये दूध वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना नवीन जनावरे खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँक सोबत करार करून 6 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी कंपनीचे संचालक पृथ्वीराज थोरात म्हणाले , राज्य शासनाने पॅकिंग दुधाला 5 रु अनुदान दिलेले नाही तसेच राज्यामध्ये दूध भेसळी बाबत सुरू असलेला अपप्रचार यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळे राज्यातील सर्वच दूध संघाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. दीपावलीसाठी एस. आर. थोरात उद्योग समूहाने जाहीर केलेल्या भरघोस दूध दर फरक व पेमेंटमुळे दूध उत्पादकच्या हाती घसघशीत रक्कम आल्याने संगमनेर मधील बाजार पेठा खरेदी साठी फुलल्या आहेत. स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या राजकीय, सामाजिक ,आध्यात्मिक व शेतकर्‍यांच्या हिताने भारावलेल्या क्रांतिकारी विचारांच्या प्रेरणेतून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या एस. आर. थोरात उधयोग समूहाची शेतकर्‍यांच्या प्रती असलेली बांधिलकी चेअरमन आबासाहेब थोरात यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खाती पैसे वर्ग झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, कामगार, सामाजिक, शैेक्षणिक, आध्यात्मिक, राजकीय कार्यकर्ते, महिला युवक, युवती, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, व मित्र परिवार आणि उद्योग समुहाच्या हित चिंतकाना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे आवाहन थोरात उद्योग समुहा तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget