घाटबोरी येथे आग लागून तीन घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

घाटबोरी,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे 2 नोव्हेंबरच्या रात्री 2 वाजता गावकरी गाढ झोपेत असतांना अचानक तीन घरांना आग लागून फर्नीचरसह लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. येथील गुलाब गंगाराम दाहीरे, अनिसअल्ली ईनुसअल्ली, अजमतअल्ली इसुबअल्ली या तिघांच्या घराला रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून त्यांची घरे व परवाना असलेल्या कटसाईज सागवान लाकडे आगीत भस्मसात झाली. गुलाब दाहीरे यांची घरची परिस्थिती अत्यंत गरीब असून या आगीत घरामध्ये संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य अंदाजे सत्तर हजार रूपयांचे नुकसान झाले. तर अनिसअल्ली यांच्या घरामध्ये फरर्निचर साहित्य, परवाना पास क्र. 1402812 असलेल्या कटसाईज सागवान माल, इतर साहित्य अंदाजे दोन लाख रुपयांचे आगीत नुकसान झाले. तसेच अजमतअल्ली यांचे घरात सुध्दा फर्निचर साहित्य, परवाना पास क्र. 1402938 धारक कटसाईज सागवान माल व घरगुती साहित्य अंदाजे एक लाख वीस हजाराचे आगीत नुकसान झाले. अचानक लागलेल्या आगीमुळे घर मालकांची व गावकरी यांची ताराबंळ उडाली. आग विझवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले. परंतु आगीचा भडका एवढा मोठा होता की, आग काही केल्याने आटोक्यात येत नव्हती. सरपंच गजानन चनेवार, उपसरपंच सुभाष नवले, वनसमिती अध्यक्ष संतोष नवले यांनी नळाचे पाणी सोडून आगीवर पाण्याचा वर्षाव करून तीन तासात आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी विलास अंभोरे, सुभाष काशीद, महादेव नवले, शेख मोबिन, रामेश्‍वर नवले, संतोष मस्के, सोपान नवले, अयुब मिस्ञी यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत नुकसान झालेल्या लोकांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी माजी सरपंच विष्णुपंत पाखरे, दिलीप पाटील नवले, संतोष अवसरमोल, प्रल्हादआप्पा चुकेवार, बिट्टुआप्पा चुकेवार, सुधीर घोडे, श्रीकृष्ण वाघमारे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. दरम्यान सकाळीच येऊन तलाठी संजय शेळके व कोतवाल रमाकांत पवनवार यांनी आगीत जळालेल्या घराची पाहणी करून पंचनामा केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget