ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे याचे नगरसेवक पद रद्द !


ठाणे : प्रतिनिधी
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ ड मधून निवडून आलेले मोरेश्वर किणे यांचे नगरसेवक पद शनिवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रद्द करण्याचा केले आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९ तरतूद कलम १० (१ड) अन्वये हे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.यापूर्वी सप्टेंबर महिन्यात जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 - अ च्या भाजपाच्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे.पालिकेने आत्तापर्यंत सलग दोन नागरसेसिकांचे नगरसेवक पद रद्द केल्याचे पालिकेतील वादग्रस्त नगरसेवकांना धक्का बसला आहे .


ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक - २०१७ रोजी मोरेश्वर किणे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवीत असताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी व अपूर्ण माहिती दिली होती . मुंब्रा येथील ‘गणेश पॅलेस'.व ‘लक्ष्मी सावला’ ठाकूरपाडा या दोन अनधिकृत बांधलेल्या इमारतीचा उल्लेख न केल्यामुळे बाळासाहेब जांभळे यांनी त्यांच्या विरोधी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.दिनांक २६ ऑक्टोंबर २०१८ रोजी ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनी विभागाकडील अभिलेखावर असलेल्या नोंदीच्या आधारे तक्रार अर्जातील दोन्ही इमारती अनधिकृत असल्याचे घोषित केले.सदर इमारतीबाबत किणे यांचे दायीत्व सिध्द झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९ चे कलम १०(१ड) अन्वये त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले असल्याचे पालिकेने अधिकृतरीत्या जाहिर केले आहे.Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget