Breaking News

शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले आहे. अद्यापही काही दहशतवादी या परिसरात लपून बसले असल्याची शक्यता आहे. 

शोपियां जिल्ह्यातील खुदपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जनांमध्ये झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही. मात्र हे दोघेरी लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी असल्याचा अंदाज आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागातील नागरिकांना चकमकीसंदर्भात पूर्वीच सूचना दिलेली होती. जम्मू पोलिसांनीही त्यांना चकमकीच्या ठिकाणापासून दूर राहण्यास सांगितले होते.