Breaking News

अल्प संख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख हे बीड जिल्हयाच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी रात्री ७.३० वाजता औरंगाबाद येथून वाहनाने बीडकडे प्रयाण, रात्री १०.०० वा. शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन मुक्काम व राखीव. मंगळवार दि. ४ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता जैन समाजाच्या प्रतिनिधीची भेट, सकाळी १०.३० वाजता बौध्द समाजाच्या प्रतिनिधीची भेट, सकाळी ११.०० वाजता शिख समाजाच्या प्रतिनिधीची भेट, सकाळी ११.३० वाजता ख्रिश्चन समाजाच्या प्रतिनिधीची भेट, दुपारी १२.०० वाजता मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीची भेट, दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी, पालिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/निरंतर), सेवायोजन अधिकारी, लीड बँक मॅनेजर, जिल्हा वक्फ अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांचे सोबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, बीङ (पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा) सायं ४.०० वाजता पत्रकार परिषद, रात्री ७.३० वाजता बीड येथून लातूरकडे प्रयाण करतील.