शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश ‘बोगस शासन आदेश’ देणारे रॅकेट


लातूर : 25 लाख रुपये घेऊन शिक्षणाधिकार्‍यांच्या बोगस सहीचे खोटे नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी या प्रकरणातील फिर्यादी सतीश ढगे यांनी पोलिसांसह न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी तुळशीराम शिंदे शाळेच्या संस्थाचालकासह 6 जणांविरुध्द येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.

लातूरच्या विठ्ठल नगर, खणी विभागातील तुळशीराम शिंदे प्राथमिक शाळेचे संस्थाचालक राजेंद्र तुळशीराम शिंदे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती महानंदा उस्तुरगे, या शाळेतील शिक्षक तथा संस्थाचालकाचे नातेवाईक गणपती राम माने यांच्यासह शिक्षक संघटनेचे मोहन हाके, भगवान बिरादार, सुर्यकांत बिरादार यांनी या शाळेत शिक्षकपदाची कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सतीश बाबुराव ढगे या युवकाकडून 25 लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे तर शिक्षणाधिकार्‍यांच्या बनावट सहीचे शिक्षक नियुक्तीचे बोगस शासन आदेशही त्यास दिले. ही बाब उघड झाल्यामुळे या युवकाने आपण वडिलांची पेन्शन आणि शेतमाल विकून दिलेले हे पैसे परत मिळावे अशी विनवणी संस्थाचालकाकडे केली. त्यामुळे आता त्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 294 कलम 420, 468, 471, 506 प्रमाणे वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget