कपडे, फराळाचे वाटप करून उपेक्षितांच्या चेहर्‍यावर फुलवले हास्य


चिखली,(प्रतिनिधी): हातावरचे जिणे जगणारे, कुडाच्या घरात, पालाच्या घरात राहणार्‍या आदिवासी बहुल गोर-गरीब लोकांच्या मुलांनाही दिवाळी इतरांप्रमाणे साजरी करता यावी, यासाठी अनुराधा इंग्लिश स्कूलच्या वतीने असोला नाईक येथील मुलामुलींना कपडे व महिलांना साडी, पातळ व फराळाचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वृषाली बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उपेक्षित, वंचित व महिला क्षेत्रात सातत्य पूर्ण कार्य करणार्‍या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या हिरकणी कपडा बँक व अनुराधा इंग्लिश स्कूल यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

दिवाळीचा आनंद उपेक्षित जीवन जगणार्‍या कुटुंबातील मुलाबाळांना लुटता यावा, या उदात्त हेतूने अनुराधा इंग्लिश स्कूलच्या वतीने असोला नाईक येथे एका छोटेखानी आयोजित कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा वृषाली बोंद्रे, सरपंच मोहन पवार, नारायणराव राठोड, पोलिस पाटील दारासिंग राठोड, कारभारी जानकीराम राठोड, सुनील राठोड, माधवराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, परशराम पवार, मदन पवार, प्रेमसिंग राठोड, कवरसिंग पवार, रोहिदास राठोड, सुभाष चव्हाण, शाम पवार, प्रताप पवार अकोस पवार, मुख्याध्यापक जितेंद्र मराठे, दत्तात्रय परिहार, जया नन्हई, प्रशांत कुलसुंदर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात असोला नाईक येथील लिंबाजी आडे यांनी हिरकणी महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून राबवल्या जाणारे उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर या उपक्रमामुळे उपेक्षितांच्या चेहर्‍यावर दिवाळीत हास्य फुलले यानेच अनुराधा इंग्लिश स्कूलचा प्रयत्न सार्थ ठरला असे म्हणता येईल, असे प्रतिपादन वृषाली बोंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा भालके यांनी केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget