Breaking News

दुष्काळामुळे शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या


आष्टी, (प्रतिनिधी)- तालुक्यातील इमनगाव येथे सुरेश विठोबा जरांगे (३८) या शेतकर्‍याने दुष्काळी परिस्थिती व आर्थिक विवंचनेला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. 

शेती बरोबरच दुधाचा जोडधंदा ते करत होते. मात्र, यंदा शेतात काही पिकले नाही, जनावरांना चारा नाही त्यात आर्थिक विवंचना यामुळे नैराश्येतून त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.