Breaking News

शबरीमला मंदिर सोमवारी उघडणार; विशेष पुजेचे आयोजन ; दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त


तुरुवनंतपुरम - केरळमधील शबरीमला मंदिराचे दरवाजे सोमवारी विशेष पूजेसाठी उघडण्यात येणार आहेत. यावेळी कसल्याही प्रकारची गडबड वा गोंधळ होऊ नये, यासाठी पांबा ते सन्निधानमपर्यंत तब्बल 1 हजार 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शबरीमला मंदिराचे दरवाजे उद्या सोमवारी उघडण्यात येणार आहेत.

 यापार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी शनिवारी पथानमथिट्टा जिल्हाधिकार्‍यांनी परिसरात कलम 144 (जमावबंदी) लागू केले आहे. सन्निधानम, पंबा, निलाक्कल आणि इलावूंकल येथे जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही ठरावीक वयातील (10 ते 50 वर्ष) महिलांना मंदिरात प्रवेश करता आला नव्हता. शबरीमला हिंसाचारप्रकरणी केरळ पोलिसांनी साधारणपणे 2 हजार 61 जणांना अटक केली आहे. तसेच 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखल्याप्रकरणी तब्बल 452 जणांविरुद्ध खटला दाखल केला आहे.