छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यास शिवीगाळ केल्याप्रकरणी सुरक्षा अधिकार्‍यावर तक्रार दाखल

राहुरी/प्रतिनिधी
माहितीच्या अधिकारात सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाची माहिती मागविल्याचा राग मनात धरून छावा क्रांतीवीर सेनेचे युवा प्रदेश उपाध्यक्ष योगेश सजगुरे यांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे आज दि.06 रोजी कलम 504, 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की छावा युवा उपाध्यक्ष योगेश सजगुरे यांनी सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरती प्रक्रियेची माहिती मागविण्यासाठी विद्यापीठ कुलसचिव यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला. सदर बाब सुरक्षा अधिकार्‍यांच्या कळताच त्यांनी योगेश सजगुरे यांच्यावर विविध मार्गाने दबाव निर्माण केला .व त्यांना शिवीगाळ केली .याबाबत योगेश सजगुरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षनाथ शेटे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पो.हे.कॉ.राठोड हे करत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget