Breaking News

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे याच्या मध्यस्थीने उपोषणाची तिसर्‍या दिवशी सांगता


मेहकर,(प्रतिनिधी)ः बंद असलेली शेळगांव अटोळ 5 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत सुरू करण्यात यावी या मागण्यासह इतर मागण्यासाठी शेळगांव अटोळ, मंगरूळ, अमोणा येथील नागरीकांनी उपोषण सुरू केले होते. अखेर तिसर्‍या दिवशी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता झाली. ग्रामपंचायत सदस्य डॉ. विकास मिसाळ, संतोष बोर्डे, देवानंद गवते, प्रल्हाद इंगळे यांनी शेळगांव अटोळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात उपोषण सुरू केले होते. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपोषण मंडपास भेट देऊन निवासी जिल्हाअधिकारी यांचेशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क साधून मंगरूळ येथे त्वरीत टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा असे सुचवले. तसेच शेळगांव अटोळ पाणी पुरवठा योजना जि.प. च्या ताब्यात असल्याने जि,प.अध्यक्ष यांचेशी भ्रमनध्वनीवरून उपोषणावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली. 

तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीसुद्धा उपोषणाला भेट देऊन उपोषण कर्ते यांच्या समस्या जानुन घेतल्या, संध्याकाळी जि.प. अध्यक्ष, जि.प. सदस्य आणि उप कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हे उपोषण स्थळी दाखल झाले. जि.प. अध्यक्षा आणि उप कार्यकारी अभियंता यांनी या योजनेअंतर्गत ज्या गावाना पाणी पुरवठा होत नाही अशा गावाना या योजनेतून वगळून त्या गावाना नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल तसेच शेळगांव अटोळ या गावासाठी ही योजना जिल्हा परिषदेमार्फत निविदा काढून त्वरीत सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल व या योजनेत समावेश असलेल्या 5 ही गावाचा समावेश नविन पाणी पुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या आराखड्यात घेण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिल्याने आ.डॉ. शशिकांत खेडेकर, भाजप नेते शिवचंद्र तायडे, जि.प.सदस्या श्रीमती सुनंदाताई सिनगारे, उप कार्यकारी आभियंता चव्हाण, जि.प.चे माजी उपाध्यक्ष पांडूरंग खेडेकर, बाजार समिती संचालक संजय गाडेकर, सुधीर पडघान, भुजबळ गटविकास अधिकारी, आनिल खेडेकर व परीसरातील महीला, पुरूष उपस्थित होते.