चेस व योगा स्पर्धेचे अशोकसिंह सानंदा यांच्या हस्ते उद्घाटन


खामगाव,(प्रतिनिधी): शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बाबुजी थानवी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा चेस असोशिएशन व बुलडाणा जिल्हा युथ असोशिएशन यांच्या वतीने दि.4 व 5 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय चेस स्पर्धा व जिल्हा स्तरीय योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन 4 नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बाबुजी थानवी, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चेतन लोडाया, टिळक राष्टीय विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.आर.उपर्वट, माजी प्राचार्य श्यामसुंदर बोहरा, बाबुरावजी धोरण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बाबुजी थानवी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना बाबुजी थानवी म्हणाले की, उत्कृष्ट भावी पिढी निर्माण करण्याकरीता मातृशक्तीने आपल्या मुला मुलींना चांगल्या संस्कार घालणे गरजेचे आहे. खेळाडुंनी चांगल्या सवयींचा अंगीकार करावा व वाईट सवयींना तिलांजली द्यावी, चांगले परिश्रम करुन, चांगला सराव करुन, नियमीत व्यायाम करुन, खेळाच्या माध्यमातुन आपला, आपल्या परिवाराचा व आपल्या शहराचा नावलौकीक उंचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना अशोकसिंह सानंदा यांनी सांगितले की, जीवनामध्ये खेळाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाने आपल्याला ज्या खेळामध्ये आवड आहे तो खेळ खेळुन चांगला सराव करुन आपले उज्वल भविष्य घडवावे असे सांगुन बाबुजी थानवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडुंचे अभिनंदन केले. योग स्पर्धेमध्ये विविध वयोगट तयार करण्यात आले असून सर्व गट मिळून जवळपास 95 स्पर्धकांनी सहभाग घेतला तसेच चेस स्पर्धेमध्ये जवळपास 175 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी चिरंजीव वरद जोशी व सुर्योदय पारधी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्याक्षिके दाखविली. तसेच मुलींनी ग्रुप योगाच्या माध्यमातुन प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन गुजराथी यांनी तर आभार प्रदर्शन महावीर थानवी यांनी केले. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी या स्पर्धेला भेट देउन खेळाडुंचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्यासमवेत शहर काँग्रेस कमिटीचे सचिव अशेाक मुळे, श्रीकांत भुसारी, विदर्भ कबडड्ी असो.चे अध्यक्ष अशोकबाप्पु देशमुख, युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार चंदेल आदींची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता नागडा मॅडम, मनोज सेवक, ज्ञानेश सेवक, अमोल इंगळे, कोलते, उपर्वट, डहाके, योग शिक्षक कल्याण गलांडे, देवेंद्र शेगोकार, चव्हाण, उमेश तायडे, शिवा जांगीड, गजानन राउत आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget