Breaking News

धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्यास उपस्थित रहा-माधव निर्मळ


कल्ले धारुर,(प्रतिनिधि): ३० नोव्हेंबर रोजी माजलगाव येथे धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी होणार्या धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आहवान करत धनगर समाजाचे नेते माधव तात्या निर्मळ यांनी काल धारुर येथील पेठ धनगरवाडा व कसबा विभाग धनगरवाडा बैठका घेतल्या या बैठकील धनगर समाजाचे नेते तथा जि.प.सदस्य कल्याण आबुज,वगरे नाना, डॉ.सरवदे, प्रकाशजी गवते, जि.प. सदस्य सोमनाथ शेळके, अँड. आर. पी.गोरे,यशवंत गायके, अनिल शेळके, इंजि.सुधाकर शेळके, महादेव शेळके,उपस्थित होते. ३० तारखेला माजलगाव येथे होणाऱ्या धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्याची जय्यत तयारी सुरु आसुन या निमित्त काल धारुर येथील पेठ धनगरवाडा व कसबा विभाग धनगरवाडा येथे बैठका घेण्यात आल्या धनगर समाजाला एस.टी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे ही धनगर समाजाची मागणी आहे.

सरकारने पहिल्या कँबिनेट मध्ये धनगर आरक्षणचा प्रश्न मार्गीला आसे आश्वासन दिले होते परंतु सरकारने आजपर्यंत कसलीही दखल घेतलेली नाही.त्यामुळे सरकारला झोपतुन जागे करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी होणार्या एल्गार महामेळाव्या मोर्या संख्येने उपस्थित राहण्याचे आहवान मेळाव्याचे मुख्य आयोजक माधव तात्या निर्मळ यांनी केले आहे.

या बैठकीस भारत शेळके,पप्पु गायके,कृष्णा गायके,अँड.ए.के.निगुळे,बब्रुवान शेळके,मारुती गायके,केशव शेळके,अशोक गायके,पिंटु गुरव, प्रविण गायके उपस्थित होते.