समाज घडवण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्यकता - आमदार जगताप


अहमदनगर (प्रतिनिधी) - संस्था कुठलीही असो, ती चालवणारी माणसे कशी आहेत, यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. समाजाचे कामसुद्धा संस्थेप्रमाणे चालते. समाज घडवण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्यकता आहे. सुदृढ समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यायला हवे, असे मत आमदार अरुण जगताप यांनी व्यक्त केले. 

सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा आमदार जगताप यांनी मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, उद्योजक अमोत पुराणिक, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, भूपेंद्र परदेशी आदी उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, वर्षभरात शिंदे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, ब्लँकेट वाटप, गरीबांना कपडे, शालेय साहित्य, मोफत स्त्रीरोग आरोग्य शिबिर, पोलिसांसाठी दंत तपासणी, गौरी सजावट स्पर्धा, शाळांमध्ये विविध विषयांवर व्याख्यान, असे अनेक सामाजिक कार्य त्यांच्याकडून नि:स्वार्थ भावनेने चालू आहे. हे गौरवास्पद आहे. 

सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, एकविचाराचे कार्यकर्ते एकत्र आणण्यासाठी फारसे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ध्येय साध्य करण्यासाठी पुढे चालत राहा. एकविचाराचे कार्यकर्ते आपोआप मागे येतील. वर्षभरापूर्वी सामाजिक योगदानासाठी ठोस भूमिका घेतली. त्यावेळी आपल्याला समाजाचा पाठिंबा मिळेल का? असा विचार केला नाही. त्यामुळे आज फाउंडेशन यशस्वीरित्या सामाजिक योगदान देत आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget