मेढ्यातील जवानाचा शिलॉंग कॅम्पमध्ये मृत्यू

कुडाळ  (प्रतिनिधी) : भारतीय सेनेत कार्यरत असणारे अशोक धनाजी जाधव (रा. उंबरीवाडी पोस्ट अंधारी, सध्या रा. मेढा) हे शिलॉंग कँप येथे कार्यरत असताना रात्री विश्रांती घेत असताना बेडवर मृतावस्थेत सापडले. दरम्यान, यासंदर्भात उमरोई येथे त्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

भारतीय सेनेमध्ये 22 महाराष्ट्र बटालियन आर्मीमध्ये ते कार्यरत होते. भारतीय सेनेत कार्यरत असताना अचानक त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सैनिक केंद्राकडून मिळाली. सतरा वर्षांपूर्वी ते भारतीय सेनेमध्ये भरती झाले होते. 

इंजिनइर म्हणून ते शिलॉंग उमरोई कँपमध्ये कार्यरत होते. अशोक जाधव यांचे कुटुंब सध्या मेढा येथे राहत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, तीन बंधू, आई, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget