Breaking News

तरुनांनी व्यसनापासुन दुर रहावे तरच भारत देश महासत्तेकडे वाटचाल करेल-सत्यपाल महाराज


गेवराई (प्रतिनिधी):- बीड जि प आर्थ व बांधकाम सभापती युद्धाजित दादा पंडीत यांच्या वाढदिवसानिमीत गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथे दि ३ नोव्हेंबर रोजी सरपंच अरुन तौर व शिवसेना युवा सेना ढालेगावच्या वतीने सप्तखंजीर वादक, समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी किर्तन आयोजित करुन समाज हिताचे उपक्रम राबवत वाढदिवस थाटात संपन्ऩ झाला. 

यावेऴी कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंञी बदामराव पंडीत, तर मुख्यसत्कार मुर्ती बीड जि, प ,आर्थ बांधकाम सभापती युद्धाजित पंडीत, प्रमुख पाहुणे युवानेते यशराज पंडीत, शिवसेना ता प्रमुख कालीदास नवले, माजी सरपंच अमरसिंह मस्के,डॉं तौर साहेब, उपसभापती भिष्माचार्य दाभाडे, गोविंदराव तौर, पप्पु तौर सरपंच मुकुंद बाबर, बबलु खराडे, माजी सरपंच गणेश चव्हाण, सरपंच सुदाम आर्दड, राजु तऴेकर आदींच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रबोधकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या किर्तनातुन समाजहिताचे उपदेश देत स्ञीभ्रुनहत्या  बंद करा, झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा, सर्वांनी समाज हिताच्या कामात सहकार्य करा जाती धर्माचे बंधन तोडा तसेच आपल्या कल्लेद्वारे प्रेक्षकांना खळखळुन हसवत विविध प्रकारे खंजीरीवाद्य वाजुन प्रबोधन केले. यावेऴी भास्कर सोळुंके गोपाल चव्हाण, करण यमगर, सुनिल मिसाऴ, दादासाहेब तौर, प्रताप तौर, किरन शिंदे,तुकाराम चोपडे,यांच्यासह आयोजक सरपंच अरुन तौर, अशोक तौर, शरद शिंदे, राजु नाडे व परिसरातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते