Breaking News

लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांची हत्या


हिंगोली (प्रतिनिधी)ः लग्नास नकार दिल्याने चार जणांनी मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची घटना हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात घडली आहे. कैलास शिंदे असे हत्या झालेल्या पित्याचे नाव आहे. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले भुजंग शिंदेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. 

दाताळा बु. येथील कैलाश शिंदे यांना एक मुलगी आहे. ही मुलगी सचिन नारायण सूरनर याने लग्नासाठी पसंत केली होती; मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनचे स्थळ नाकारले होते. तसा नकारही कळवला होता. त्यामुळे सचिन संतापला होता. हाच राग मनात धरून सचिन नारायण सुरनर, किरण नारायण सुरनर, नितीन विश्‍वनाथ कवडे, गणेश नामदेव कवडे यांनी कैलास शिंदे एका मंदिराजवळ बसलेले असताना त्यांच्यावर गुप्ती व धारदार शस्त्राने वार केले. हा प्रकार पाहून भुजंग शिंदे वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले असता सचिन व त्याच्या साथीदारांनी भुजंग यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात भुजंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.