बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती वादातून मुक्त

मुंबई/प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरुन सुरु असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका त्यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. हे प्रकरण पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे जयदेव ठाकरेंनी स्पष्ट केलं.


बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जयदेव ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवला होता. मृत्यूपत्रावरील स्वाक्षरीच्या तथ्यतेवर जयदेव यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. बाळासाहेबांचं मृत्यूपत्रावर त्यांची स्वत:ची सही नव्हती. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची संपत्ती हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.अखेरच्या दिवसात बाळासाहेब आजाराने जरजर झालेले होते. त्यामुळे मृत्यूपत्रावर सही करणं शक्य नसल्याचं जयदेव यांचे म्हणणे होते. त्यामुळे संपत्तीवरुन ठाकरे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता. उद्धव यांच्या माहितीनुसार बाळासाहेबांची संपत्ती ही केवळ 14.85 कोटी रुपयांची आहे. तर जयदेव यांच्या म्हणण्यानुसार उद्धव राहत असलेलं मातोश्री निवासस्थानच 40 कोटीचं आहे. याशिवाय बाळासाहेबांची अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता होती, ज्यांचा उल्लेख मृत्यूपत्रात नाही.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget